सोमेश्वरनगर प्रतिनिधी
करंजे येथिल विनोद गोलांडे यांच्या घरा पाठीमागील मोकळ्या जागेत निघालेला धामण जातीचा सर्प
देविदास कांबळे यांनी मोठ्या जिताफीने पकडल्याने त्यांचे परिसरातील नागरिकांनी मोठे कौतुक केले..
गोलांडे कुटूंबातील महिलेला धामण जातीचा सर्प आढळून आला पहाताच आरडाओरड केला, तसा धामण जातीचा सर्प मार्गस्थ झाला. सुदैवाने या सर्पामुळे कुटूंबातील कोणालाही कसलीही इजा झालेली नाही.
शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून बिळातील साप बाहेर पडला असावा. करंजेतील विनोद गोलांडे यांच्या राहत्या घरी मंगळवार दि ३० रोजी सकाळी नऊच्या सुमारास झालेला प्रकार आहे.
नेहमीप्रमाणे महिला नऊच्या सुमारास गेली असता सर्प त्यांच्या जवळून गेल्याने तिने आरडाओरड केल्याने. तो सर्प एका भितीतील बिलाचा आसरा घेत त्यामध्ये समाविष्ट झाला.
लगेचच आठ फाटा होळ येथील सर्पमित्र देविदास कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता तेही त्वरित आले त्यांनी मोठ्या जितापीने त्या धामण जातीच्या सर्पाला कोणतीही इजा न होता पकडून एका बरणीत बंद केले व सुरक्षित चौधरवाडी नजीक भापकर मळा वनविभाग ठिकाणी सोडून त्याला जीवदान दिल्याचे समाधान कांबळे यांनी बोलताना व्यक्त केले.