निरा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद असल्याने सातारा - पुणे जिल्ह्याच्या सिमेवरील नीरेच्या आठवडे बाजारत गर्दी होत आहे. नीरा येथील बुधवारच्या आठवडे बाजारात विना मास्क कोणी येऊ नये, तसेच निरा बाजारपेठत विनाकारण कोणी विनाकारण फिरू नये, म्हणून दिवसभर बाजारात खडा पहारा दिला. बाजारात फिरताना लोकांनी मास्क वापरणे पसंद केले.
नीरा शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामूळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. नीरा बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी होत असते. त्यामूळे आज पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार यांच्या नेतृत्वात एक पथक बाजारात दिवसभर ठाण मांडून होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण मांडून असल्याने बाजर मोडे पर्यंत बाजारकरू, व्यापारी व शेतकऱ्यांनी आज दिवसभर तोंडावरील मास्क खाली घेतला नाही.
यावेळी बाजारात पोलीसांनी दहा जणांवर विना मास्क बाबत कारवाई केली तर बाजार बाहेर दहा असे वीस लोकांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर १७ वाहन चालकांवर ऑनलाईन केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांनी दिली. या कारवाई मध्ये सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कऱ्हे, निलेश जाधव, होमगार्ड किरण शिंदे, प्रसाद तारू यांनी सहभाग घेतला नीराचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी पोलिसांना मदत करून कारवाईत सहभाग घेतला.