Type Here to Get Search Results !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन......

 
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव वय ७४ यांचे  सोमवारी मध्यरात्री निधन झाले. 
त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील पुसेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
न्यायप्रिय, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून धनंजय जाधव यांची ओळख होती.  
मागील काही दिवसांपासून धनंजय जाधव यांना हृदयाच्या आजाराचा त्रास होता.
    
 त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते.  ते पुण्याचे माजी पोलीस आयुक्तही होते. 
याचबरोबर धनंजय जाधव हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते.निवृत्तीनंतर त्यांना अनेक पक्षातून आँफर होती, पण त्यांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ मध्ये पुसेगाव जि.सातारा येथे झाला.  पुसेगावातच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर माध्यमिक शिक्षण वाई येथे झाले. 
     
त्यानंतर त्यांनी एम एस्सीची पदव्युत्तर पदवी घेतली.
 प्रथम ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले.
 १९७२ ला ते यु.पी.एस.सी.ची परीक्षा पास झाले आणि पोलीस अधीक्षक म्हणून धुळे येथे रूजू झाले.
 त्यानंतर वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं.  पुणे येथे  पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली होती.   काही काळानंतर त्यांची कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
 धनंजय जाधव यांनतर २००४ ते २००७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. 
त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली.  ते या पदावर २००७ ते २००८ या काळात होते आणि निवृत्त झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test