सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे बौद्धिक संपदा हक्क या या विषयावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा मु. सा. काकडे महाविद्यालय आणि अनेकांत इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होती.या कार्यशाळेचे उद्घाटन मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी केले आणि कार्यक्रमाला शुभेछा दिल्या व या कार्यक्रमाचे महत्व विषद केले. अनेकांत इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. एम. ए. लाहोरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. चेतना तावरे यांनी केला तर डॉ. डी. पी. मोरे यांनी बौद्धिक संपदा हक्क याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.यात बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय, पेटेंट आणि कॉपी राईट म्हणजे काय, बौद्धिक संपदा हक्काचे प्रकार किती, ते कोठे नोंदणी करायची असते याचे प्रत्यक्ष सादरीकरण(डेमो) केले. शेवटी विद्यार्थांच्या शंका-समाधानाचा कार्यक्रम झाला. या कार्यशाळेचे आयोजन समन्वयक प्रा. प्रवीण जाधव यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव जयवंत घोरपडे, सहसचिव सतीश लकडे, प्राचार्य जवाहर चौधरी कार्यालय अधिक्षक शिवाजी नेवसे, उपप्राचार्य डॉ. जे. एम. साळवे, उपप्राचार्य डॉ. जया कदम, अंतर्गत गुणवत्ता सुधार कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संजू जाधव तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. रजनीकांत गायकवाड यांनी केले.
या ऑनलाइन कार्यशाळेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.