सोमेश्वरनगर प्रतिनिधी
रोजच्या आपल्या व्यवसायातून अनेकांचा प्रपंचाचा गाडा सुरू असतो, यातूनच काही पैशाची बचत करून संसाराचा गाडा हाकला जातो; कोरोनामुळे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. जिल्ह्या सह बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मध्ये असणारे लॉड्री व्यवसायाबरोबर नाभिक व्यावसायिक, फूल विक्रेते, वॉशिंग सेंटर, सर्व्हिसिंग सेंटर, छोटे हॉटेल्स, यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून कौटुंबिक बिकट आव्हानाचा सामना या व्यासायिकाच्या समोर उभा राहिला आहे.
त्याच कोरोणाच्या रुग्ण संकेत वाढ होत असल्या कारणाने राज्य शासनाने मंदिरे यात्रा -जत्रा ,सण- उत्सव लग्न समारंभ , छोटे-मोठे कार्यक्रम रद्द असल्याने लॉन्ड्री व्यवसाय मोठी कळा निर्माण झाली आहे , हे समारंभ असतील तरच नागरिक कपडे धुणे, त्याला भट्टी व इस्त्री साठी या व्यवसायाकडे आवर्जून आले असते असे ननावरे दाम्पत्यांनी बोलताना सांगितले
परंतु कोरोना संसर्ग कधी कमी होणार व आणखी किती काळ चालेल याचा ही अंदाज नसल्याने या व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
करोनामुळे या व्यवसायिकांनी आधीच काही काळ आपला व्यवसाय बंद केला होता दिवाळी नंतर यर जानेवारी ते मार्च पर्यंत लहान-मोठी विवाह मुहूर्त गाव यात्रा ,लग्न सोहळे असतात, त्याबरोबर छोटे-मोठे कार्यक्रम,न झाल्याने नवीन लॉन्ड्री व्यवसाय कुटुंब चालवण्यासाठी कर्जाचा डोंगर झाला आहे होतो तोरणा चा संसर्ग असाच राहिला तर उपासमारीची वेळ येणार आहे.
...लॉड्री व्यावसाईक राजेंद्र ननावरे...
( करंजे-सोमेश्वरनगर.)