पुरंदर तालुका प्रतिनिधी-सिकंदर नदाफ
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जेजुरी येथे आर टी ओ कॅम्प निमित्त मोटर मालक व वाहन चालक यांची नेत्र तपासणी व ब्लडप्रेशर ची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली ब्लडप्रेशर व नेत्र तपासणी साठी संतोष राजगुरू, मयुर फुंडे, अभिजित पानसरे, किरण जाधव आदींनी सहभाग घेतला होता.
जेजुरी येथील धालेवाडी रोडवर असलेल्या टेक्निकल हायस्कूल येथे या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मोटर वाहन निरीक्षक संतोष झगडे, अभिजित गायकवाड, मारुती पाटील, गाढवे साहेब आदि उपस्थित होते,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी यावेळी मोटार मालक व वाहन चालक यांना मार्गदर्शन केले वाहनांची देखभाल, दुरुस्ती व विमा या संदर्भात आर टी ओ ऑफिसर संतोष झगडे यांनी माहिती सांगितली, यावेळी चार चाकी व दुचाकी वाहन चालकांच्या चाचण्या घेऊन त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश भालेराव, देविदास कुंभार, मिलिंद आगलावे, सुभाष इंदलकर,राजु लवांडे , पांडुरंग नानगुडे आदिंनी केले