पुरंदर तालुका प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
होळी पौर्णिमा उत्सव जेजुरी शहरात अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येतो महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरी गडावर होळी पौर्णिमा साजरी केली जाते प्रथमतः जेजुरी गडावरील मंदिर आवारात होळी पेटवली जाते आणि नंतर गावांमधील मानाचे असणारे हनुमान तालीम मित्र मंडळाची होळी पेटवली जाते, नंतर जेजुरी शहरातील विविध मंडळे, विविध संस्था तसेच घराघरात असणा-या होळी पेटवल्या जातात, जेजुरी गडावर मंदिर आवारात पेटवल्या जाणा-या होळीसाठी जेजुरी ग्रामस्थांकडून सरपण,गोवरी व पैसे स्वरुपात वर्गणी गोळा केली जाते, यासाठी होळीच्या दिवशी ठरलेले मानकरी, चोपदार मंदिरामध्ये धुपारती झाल्यानंतर गावांमध्ये वर्गणी गोळा करण्यासाठी फिरतात, मोरे ढोल वाजवत आणि चोपदार हाळी देत वर्गणीची मागणी करतात तर डिखळे आणि भालेराव ग्रामस्थांकडून वस्तू आणि वर्गणी गोळा करतात सर्व जाती धर्माचे लोक आपल्या इच्छा शक्ती प्रमाणे होळीसाठी हातभार लावतात गेली कित्येक पिढ्या हि परंपरा चालू आहे आणि आजही त्यामध्ये कोणताही खंड न पडता मानकरी भर उन्हात गावभर फिरून होळीसाठी वस्तू व वर्गणी गोळा करत असतात सायंकाळी गोळा झालेल्या वस्तु व रोख रक्कम यातुन साहित्य खरेदी करून गडावर पोहचविले जाते, जेजुरी गडाच्या कोटा बाहेर होळी रचली जाते रात्री मंदिरातील पुजा झाल्यानंतर होळी पेटवली जाते मंदिरातील होळी पेटल्या शिवाय गावातील कुठलीही सार्वजनिक अथवा घरगुती होळी पेटवली जात नाही हि परंपरा आजही या ठिकाणी पहावयास मिळते