मोरगाव प्रतिनिधी
अष्टविनायकापैकी एक असलेले थेऊर ता. हवेली येथील चिंतामणी मंदिर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे . याबाबतचा आदेश हवेली तालुका उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी काढलेला असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
दर महीन्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भावीक भक्त श्रींच्या दर्शनासाठी अष्टविनायक तिर्थक्षेत्री येतात . यामुळे हजारो भावीकांची गर्दी या क्षेत्री होते. सध्या कोरोणाचा वाढत असलेला फैलावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवले जात आहेत . अष्टविनायकातील एक असलेले थेऊर येथील चिंतामणी मंदिरात दर संकष्टी चतुर्थीस परीसरातुन व पुणे शहरातुन येणाऱ्या भावीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते .
यामुळे दि. 31 मार्च रोजी चिंतामणी मंदिर सर्व भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे . याबाबत आदेश चिंचवड देवस्थान ट्रस्टला नुकताच प्राप्त झालेला आहे . या बंद काळात श्रींच्या नियमितपणे चालत आलेल्या पूजा -अर्चा , नैवेद्य ,व ईतर धार्मिक विधी पार पडणार असून दि १ एप्रिल रोजी चिंतामणी मंदिर सर्व भावीकांना नेहमीप्रमाणे दर्शनासाठी खुले केले जाणार असल्याची माहिती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.