Type Here to Get Search Results !

पुरंदर विकासाला निधी कमी पडू देणार नाही – जगताप

वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ 

पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ हे होणारच परंतु त्या दृष्टीने पुरंदरच्या विकासाला देखील निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांनी दिली . 
वाल्हे नजीक सुकलवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार संजयजी जगताप व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी येथील १२ लाखाच्या ग्रामपंचायत इमारतीसह गावाअंतर्गत सिमेंट कॉंक्रीटीकरण रस्त्याचे भूमिपूजन करताना आमदार संजयजी जगताप हे बोलत होते.ते पुढे म्हणाले पुरंदर मध्ये होऊ पाहणाऱ्या विकास कामांसह सर्व सामान्य जनतेच्या अडी -अडचणी  सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे. तसेच  विरोधकांच्या भाकडकथा ह्या विकासाला ग्रहण लावत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे तितकेच जरुरी असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले .   
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार पुरंदर कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रदीपजी पोमण यांसह पुष्कराज जाधव वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले माजी उपसरपंच दत्तात्रेय पवार महादेव चव्हाण महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ.प. अशोक महाराज पवार राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस दादासाहेब मदने तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार दादासाहेब म्हेत्रे संदेश पवार शिवसेनेचे राहुलजी यादव किरण कुमठेकर जयवंत भुजबळ साईनाथ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुमठेकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार सुकलवाडी गावच्या सरपंच जयश्री चव्हाण यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test