पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ.
सामाजिक कार्यकर्ते गोरख मेमाने यांच्या विशेष प्रयत्नातून व किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड जेजुरी एमआयडीसी यांच्या सी .एस. आर .फंडातून वाल्हे ग्रामपंचायती अंतर्गत अंबाजीची वाडी येथे उभारण्यात आलेल्या राजा शिवछत्रपती जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले....... या प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांसह जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई पवार, कॉंग्रेसचे प्रवक्ते विजय भालेराव ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले काँग्रेसचे राष्ट्र सरचिटणीस गणेश जगताप वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले महर्षी वाल्मिकी वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष ह.भ. प. अशोक महाराज पवार ग्रामपंचायत सदस्य किरण कुमठेकर हनुमंत पवार तसेच सोनाली पवार राजेंद्र पवार नवनाथ पवार हरिश्चंद्र पवार सत्यवान सूर्यवंशी संतोष पवार पुनम पवार त्रिंबक माळवदकर विकास पवार विठ्ठल पवार सचिन पवार यांसह गणराज मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या दरम्यान आमदार संजयजी जगताप म्हणाले जलशुद्धीकरण केंद्र आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण असून ग्रामीण भागातील विकासात्मक कामांना निश्चितच प्राधान्य देणार आहे .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार निळूभाऊ पवार यांनी मानले..