सोमेश्वरनगर प्रतिनिधी
चौधरवाडी ( ता.बारामती) ग्रामपंचायत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होळ व उपकेंद्र करंजे यांच्यावतीने गुरुवारी दि २५ रोजी चौधरवाडी गावातील ग्रामस्थ नागरिकांना बीपी शुगर तसेच शारीरिक इतर आजारांचे तपासणी करण्यात आली करत औषधे उपचार करण्यात आला या शिबिरांमध्ये एकूण १२७ स्त्री पुरुष यांनी सहभाग नोंदवला होता ,
याकामी चौधरवाडी सरपंच अंजना चौधरी , ग्रामसेविका एस.एस जगदाळे व पोलीस पाटील राजकुमार शिंदे यांच्या हस्ते तपासणी झालेल्या नागरिकांना औषधे व कार्ड वाटप करण्यात आले, डॉ. दीपक गोसावी यांच्याकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरास बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे याच्या मार्गदर्शनाखाली डॉ पी व्ही बाबर , डॉ.ए पी अलगुडे डॉक्टर , पी एच सी वैद्यकीय अधिकारी डॉ डी एम राजने यांच्या अंतर्गत शिबिर घेण्यात आले , या शिबिरामध्ये आरोग्यसेवक डॉ संभाजी कसबे व आरोग्य सेविका ज्योती खुडे ,
आशा वर्कर यांचाही सहभाग असून ग्रामस्थांनीही या तपासणीसाठी चांगला प्रतिसाद दिला तर माहिती घेत आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येईल व आपल्या कुटूंबाची काळजी घेण्यास लागणारी माहितीही नागरिकांनी शिबिरा प्रसंगी घेतले.
ग्रामस्थांनी कोरोना चा संसर्ग होऊ नये व तो कायचा हद्दपार व्हावा म्हणून जी लस शासनाने उपलब्ध केली आहे ती लस घ्यावी , ही लस सुरक्षित आहे असे मार्गदर्शनही डॉ. दीपक गोसावी यांनी या प्रसंगी ग्रामस्थांना सर्व ग्रामस्थांना पटवून सांगत त्यांचे विषयी शंका-कुशंका यांचे निरसन केले.