कोऱ्हाळे बुद्रुक येथील तरुण अनिश सुनिल खोमणे पाटील ( वय. १७ ) याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांपूर्वीच सोमेश्वर नगर येथे अनिश च्या दुचाकीचा ट्रॅक्टर सोबत अपघात झाला होता. या अपघातात अनिश ला जबर दुखापत झाली होती. त्याच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी अनिशची मृत्यूशी चाललेली झुंज संपली.
अनिश हा प्रसिध्द उद्योजक संग्राम सोरटे यांचा भाचा होता.
अनिश हा अत्यंत नम्र, सुस्वभावी, हसतमुख व शांत मुलगा होता. त्याच्या स्वभावाने त्याने पंचक्रोशीत मोठा मित्र परिवार जोडला होता. त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून आज ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत अनिशला श्रद्धांजली वाहिली.